मोदी 2.0 ; सोन्या-चांदीसह पेट्रोल-डिझेलही होणार महाग!


नवी दिल्ली – आज संसदेत मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पण मोदी सरकारने या अर्थसंकल्पाकडून मोठी अपेक्षा लावणाऱ्या सर्वसामान्यांना झटका दिला आहे. सोने-चांदीसाठी लागणाऱ्या सीमाशुल्कात वाढ करण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतल्यामुळे सीमाशुल्क 10 टक्क्यांवरुन 12.5 टक्के आकारण्यात येणार आहे.

सीमाशुल्कात वाढ झाल्याने सोने-चांदीच्या दरात वाढ होणार आहे. सोन्याच्या दरात 800 रुपये तर चांदीच्या दरात 1000 रुपये वाढण्याची शक्यता आहे. मोदी सरकारकडून मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सोने चांदीसोबत पेट्रोल-डिझेलवर लावलेल्या 1 रुपये अतिरिक्त करामुळे पेट्रोल-डिझेलही महाग होणार आहे. त्याचसोबत मार्बल, व्हिडीओ रेकॉर्डर, ऑटो पार्ट्स, सीसीटीव्ही कॅमेरा यासारख्या गोष्टीही महाग होणार आहेत.

Leave a Comment