पंजाब महिला आयोगाची हनी सिंहला नोटीस


पंजाबच्या महिला आयोगाने प्रसिद्ध रॅपर हनी सिंह याला नोटीस पाठवली असून आपल्या मखना या गाण्यात हनी सिंहने स्त्रियांबद्दल अशोभनीय भाषा वापरली असल्याचे यात म्हटले गेले आहे. याविरोधात लवकरच एफआयआर दाखल करणार असल्याचे पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्ष मनीषा गुलाटी यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर याविरोधात लवकरच राज्य सरकारही कारवाई करेल, अशी अपेक्षा गुलाटी यांनी व्यक्त केली आहे. १२ जुलैपर्यंत यासंबंधातील अहवाल सादर करण्याची विनंती पोलिसांनी आम्ही केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पंजाब राज्यात महिलांविरोधी आक्षेपार्ह शब्द असलेले हे गाणे बॅन केले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान प्रेक्षकांनी हनी सिंहच्या मखना गाण्याला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. हे गाणे केवळ महिनाभरातच 100 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले होते. त्याच्यासोबत या गाण्यात नेहा कक्करसुद्धा पाहायला मिळाली होती. आता हनी सिंह महिला आयोगाच्या या नोटीसवर काय प्रतिक्रिया देणार तसेच हे गाणे ब‌ॅन केले जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment