राजकुमार-कंगनाच्या जजमेंटल हैं क्या चा ट्रेलर रिलीज


अभिनेता राजकुमार राव स्त्री या चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशानंतर लवकरच कंगनासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. नुकताच त्यांच्या आगामी जजमेंटल हैं क्या असे शीर्षक असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून कंगना आणि राजकुमार यात पूर्वीपेक्षा वेगळ्या अंदाजात दिसत आहेत.

आधी मेंटल हैं क्या असे शीर्षक असलेल्या चित्रपटाचे आता जजमेंटल हैं क्या असे करण्यात असून हा चित्रपट रिलीज डेटपासून ते शीर्षकापर्यंत अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. प्रेक्षक या सर्व वादविवादांमुळे या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतानाच याच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट मर्डर मिस्ट्रीवर आधारित असणार असल्याचे ट्रेलरवरून दिसत आहे.

ट्रेलरमध्ये दाखवल्यानुसार एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. एका व्यक्तीचा ज्याने खून केला आहे. यात कंगना आणि राजकुमारवर पोलिसांचा संशय आहे. पण हे दोघेही या प्रकरणात पोलिसांसमोर एकमेकांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. आता हा खून नेमका कोणी केला आणि यामागचे कारण काय? हे सर्व काही चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळेल. हा चित्रपट येत्या २६ जुलैला रिलीज होत आहे.

Leave a Comment