२०० कोटींचा गल्ला जमवणारा ‘कबीर सिंह’ ठरला पहिला अॅडल्ट चित्रपट


बॉक्स ऑफिसवर शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘कबीर सिंह’ चित्रपटाला तुफान यश मिळताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्या ५ दिवसांतच १०० कोटींचा गल्ला पार केला होता. त्यातच या चित्रपटाने आता बॉक्स ऑफिसवर आपले द्विशतक साजरे करतानाचा नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ए प्रमाणपत्र दिले होते, तसे असतानाही २०० कोटींचा गल्ला जमवणारा बॉलिवूडचा हा पहिला अॅडल्ट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनानंतर अवघ्या तेरा दिवसांत २०० कोटींचा आकडा गाठला आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य ‘अर्जून रेड्डी’ चित्रपटाचा हिंदी रिमेक असून या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप वंगा रेड्डी यांनी केले आहे.

विशेष म्हणजे बॉक्स ऑफिसवर ‘अर्जून रेड्डी’ने केलेल्या कमाईचा आकडा शाहिदच्या ‘कबीर सिंह’ने अवघ्या तीन दिवसांतच पार केला आहे. आर्टिकल १५ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही ‘कबीर सिंह’च्या कमाईत फारसा फरक पडला नव्हता. मात्र, सोमवारनंतर चित्रपटाच्या कमाईत काही प्रमाणात घट झाली आहे.

Leave a Comment