जेडीएसच्या आमदाराचा आरोप; भाजपमध्ये प्रवेश करा अन् 40 कोटी मिळवा


म्हैसुर – कर्नाटकातील सरकार सध्याच्या घडीला डळमळीत स्थितीत असून भाजपला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले बहुमत पाहता अनेक विरोधी पक्षाचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. त्याच पार्श्वभूमिवर कर्नाटकातील पेरियापटना येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात जेडीएस आमदार महादेव यांनी आरोप लावला आहे, की काँग्रेस पक्षात राहण्यासाठी काँग्रेस आमदार रमेश जरकिहोली यांनी 80 कोटी रुपये मागितले आहेत तर मला भाजपत प्रवेश करण्यासाठी 40 कोटींची ऑफर मिळाली, पण त्यांची ऑफर मी नाकारल्याचे जेडीएसच्या आमदाराने सांगितले.

दरम्यान जरकिहोली यांनी विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिला नसल्याचे काँग्रेस विधिमंडळ गटनेते सिद्धरमय्या यांनी दावा केला आहे. आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी जनतेच्या प्रतिनिधींनी विकासकामे करण्याची गरज आहे अन्यथा राजीनामा, ब्लॅकमेलिंग आणि धमकी असा ड्रामा सुरु होतो.

जेडीएस आमदाराने दावा केला की, जरकिहोली यांनी माझ्या उपस्थितीत 80 कोटी रुपयांची मागणी केली होती. तसेच मला भाजपत सहभागी होण्यासाठी 40 कोटींची ऑफर दिली, पण भ्रष्टाचारविरोधी ब्युरोकडे मी तक्रार करण्याची धमकी दिली. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते सिद्धरामय्या यांनी भाजप कर्नाटक सरकार पाडण्याचा डाव करत असल्याचा आरोप केला आहे.

Leave a Comment