शॉक लागून मरण पावलेला तरुण झाला पुन्हा जिवंत!


आपण अनेक चित्रपटात एखादी व्यक्ती मरण पावल्यावर जिवंत झाल्याचे सर्रास पाहिले असेल. पण एखाद्या चित्रपटाच्य दृश्याला शोभेल अशी आश्चर्यकारक घटना सत्यात घडली आहे. मिशिगनमधील एका २० वर्षीय तरूणाने चक्क मरणाला मात दिली आहे. याबाबत इतर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार मायकल प्रुइट नामक तरुणाला विजेचा झटका लागला होता आणि तब्बल २० मिनिटांसाठी त्यामुळे त्याचा श्वास बंद झाला होता. त्याचदरम्यान डॉक्टरांनी त्याला पुन्हा विजेटे झटके देऊन जिवंत केले.

यासंदर्भातील वृत्त टाइम्स नाऊने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार आपल्या परिवारासोबत मायकल प्रुइट टेलर या ठिकाणी राहतो. घरात आपल्या सावत्र वडिलांसोबत मायकल काही काम करत होता. तो यावेळी एक धातु पायऱ्यांवरून घेऊन जात होता, अशात एका विजेच्या ताराचा स्पर्श झाला. त्याला विजेचा जोरदार शॉक बसला आणि त्याचा श्वास बंद झाला.

घराच्या मालकाने ही घटना घडताच पोलिसांना फोन केला आणि सीपीआर सुरू केला. जवळपास ४ तासांनी पॅरामेडिक्स टीम पोहोचली आणि रस्त्याने मायकलला डिफिब्रिलेटरचा वापर करून जिवंत करण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला. पण अॅम्बुलन्समध्ये त्याचे हृदय एकदाही धडधडले नाही. याबाबत माहिती देताना ब्यूमोंट हॉस्पिटलच्या डॉ. एंजल चुडलर यांनी सांगितले की, या तरूणाला जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणले गेले, तो जिवंत असल्याचे कोणतेही संकेत तेव्हा मिळत नव्हते.

हॉस्पिटलच्या अधिकारी बारबरा स्मिथ यांनी सांगितले की, मायकल हा पुन्हा जिवंत होण्यापूर्वी २० मिनिटांसाठी मृत होता. जे काही त्यांच्यासोबत घडले ते खरच चमत्कारिकच होते. कारण पाच मिनिटांपेक्षा कमी वेळेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदुतील पेशी मरायला लागतात. सीपीआर त्याला वेळीच देण्यात आल्याने त्यांच्या मेंदुला रक्तपुरवठा व्यवस्थित होत होता. त्याला पुन्हा शॉक देण्यासाठी त्याच्या पायांची बोटे आतून जाळण्यात आली.

Leave a Comment