‘हा’ पठ्ठा चक्क १ वर्ष खात होता एक्सपायरी संपलेले खाद्यपदार्थ


आपण कुठूनही विकत घेतलेल्या खाद्यपदार्थाची एक विशिष्ट एक्सपायरी डेट असते. ते पदार्थ आपण एक्सपायर झाल्यानंतर फेकून देतो. पण यावर एका पठ्ठ्याने चक्क एक संशोधन केले आहे. या पठ्ठ्याने चक्क एक वर्ष केवळ आणि केवळ एक्सपायर झालेले पदार्थ खाल्ले आहेत.

ही आयडिया स्कॉट नॅश यांना अचानक नाही आली. ते तीन वर्षांआधी एका ट्रिपवर गेले होते. ते अनेक महिन्यांनी घरी परतले. त्यांनी भूक लागली म्हणून घरात पडून असलेले एक योगर्ट खाल्ले. त्याची एक्सपायरी डेट सहा महिन्यांपूर्वीची होती. पण स्कॉटने तरीही ते खाल्ले. स्कॉट हे एका पर्यावरणवादी आणि MOM ऑर्गॅनिक मार्केटचे मालक आहेत. ही एक ग्रोसरी स्टोरची चेन आहे.


(व्हिडीओ सौजन्य -www.stuff.co.nz)
याबाबत माहिती देताना स्कॉट सांगतात की, योगर्ट टेस्ट खराब झाले नव्हते. त्याचबरोबर ते खाल्ल्यानंतर त्यांना कोणतीही आरोग्यासंबंधी समस्या झाली नाही. यानंतर त्यांनी एक संशोधन करण्याचा विचार केला. त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांनी लिहिले की, ‘एक्सपायरचा अर्थ काय होतो? प्रॉडक्टवर लिहिलेले असते, ‘बेस्ट बाय’, ‘सेल बाय’, ‘बेस्ट इफ यूज्ड बाय’ हे मला फक्त जाणून घ्यायचे होते की, हे सगळे एवढे कन्फ्यूजिंग का असते. ते पुढे लिहितात की, फूड प्रॉडक्ट डेटिंग सिस्टीममध्ये सुधारणेची गरज असून यात थोडी स्पष्टता असायला हवी. अशाप्रकारची तारीख अनेक खाद्य पदार्थांवर लिहिण्याची गरज नसते.


स्कॉट आणि त्यांच्या परिवाराने एक वर्षांपेक्षा अधिक काळ दररोज डेट एक्सपायर झालेले पदार्थ खाल्ले. यात ७ ते ८ महिन्याआधी एक्सपायर झालेले योगर्ट, दोन-तीन आठवड्यांपूर्वीचे मांस यांचा समावेश होता. अनेक महिन्यांपासून त्यांनी फ्रिजमध्ये ठेवलेले बटरही खाल्ले. ते सर्वकाही ठीक होते. त्याचबरोबर स्कॉट यांनी हेही सांगितले की, अनेक फूड प्रॉडक्ट्स खरच खराब झालेले होते. जे आम्हाला फेकावे लागले. ते म्हणाले की, माझे म्हणणे फक्त एवढेच आहे की, अशी एखादी तारीख कंपन्यांकडून दिली जात असल्याने ‘कंज्यूमर एंजायटी डिसॉर्डर’चे लोक शिकार होतात. लोक या तणावात असेही पदार्थ फेकतात जे खाल्ले जाऊ शकतात. मुळात अनेक पदार्थ ‘बेस्ट बिफोर’ तारखेनंतरही चांगले राहतात. याबाबत एफडीए, अभ्यासक आणि किराणा निर्माण उद्योगाशी संबंधित लोकही सहमत आहेत की, सामान्य नागरिक क्लिअर पॅकेज-डेट लेबलिंगने फूड प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणात फेकण्यापासून वाचतील. पण एक्सपायरी डेटबाबत वर्तमानात कोणताही ठोस कायदा नसल्यामुळे निर्माते त्यांना हवे ते लेबल प्रॉडक्टवर लावू शकतात.

Leave a Comment