वयातील अंतर नव्हे, तर मने जुळणे महत्वाचे – मलायका


मलायका अरोराने अरबाज खानसोबत केलेल्या काडीमोडानंतर ती आपल्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. ती गेल्या काही महिन्यांपासून अनेकदा अर्जून कपूरसोबत स्पॉट केली जाते. अर्जूनपेक्षा मलायका वयाने भरपूर मोठी आहे, तिने आता याबद्दलचे आपले मत मांडले आहे.

तुमचे एखाद्या नात्यामध्ये वय किती या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही. दोन मने आणि त्यांचे विचार कोणत्याही नात्यामध्ये जुळणे अधिक महत्वाचे असल्याचे तिने म्हटले आहे. पण सध्या अशा समाजामध्ये आपण राहतो, जिथे एखादा वयाने जास्त असलेला पुरूष आपल्याहून लहान आणि तरूण असलेल्या मुलीला डेट करू शकतो. पण एक वय जास्त असलेली महिला एखाद्या तरूण मुलाला डेट करू शकत नसल्याचे म्हणत वयावरून टीका करणाऱ्यांना मलायकाने टोला लगावला आहे.

यासोबतच मला अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम होईल की नाही याबद्दल खात्री नव्हती कारण पुन्हा एकदा हृदय तुटण्याची भीती होती. पण पुन्हा एकदा मला प्रेमात पडायची इच्छा होती आणि माझ्यातील आत्मविश्वास अर्जूनसोबतच्या नात्याने जागवत मला आणखी एक संधी दिल्याचे तिने म्हटले आहे.

Leave a Comment