‘दंगल’गर्लचा बॉलिवूडमधून संन्यास


जायरा वसीम हा नवा चेहरा आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटातून बॉलिवूडला मिळाला होता. तिने आपल्या पहिल्याच चित्रपटातून आपल्या अभिनयाने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. पण आता त्याच जायराने बॉलिवूडमधुन संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे.


‘दंगल’ चित्रपटात गीता फोगटच्या बालपणीची भूमिका जायराने साकारली होती. तिच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. त्यानंतर ती ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली. बॉक्स ऑफिसवर या दोन्हीही चित्रपटांनी चांगला गल्ला जमावला होता. तिला या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. तर ‘दंगल’ चित्रपटाने चीनमध्येही बॉक्स ऑफिस गाजवले. असे असुनही हा निर्णय तिने का घेतला, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

जायराने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे तिचा निर्णय जाहीर केला आहे. तिने या पोस्टमध्ये ‘अल्लाह के रास्ते से भटक गई थी’ असे लिहले आहे. मी पाच वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. माझे आयुष्य या निर्णयाने बदलले होते. माझा हा प्रवास प्रचंड थकवणारा होता. या पाच वर्षांत मी स्वत:शीच झगडले. पण एवढ्या लहान वयात मी एवढा मोठा संघर्ष करू शकत नसल्यामुळे बॉलिवूडशी नाते मी तोडते आहे. हा निर्णय मी अतिशय विचारपूर्वक घेतला असल्याचे तिने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे.

Leave a Comment