आमिर-सलमानची अंदाज अपना अपनाच्या सिक्वलमध्ये वर्णी


आजही अनेक प्रेक्षकांना १९९४ मध्ये प्रदर्शित झालेला अंदाज अपना अपना चित्रपट आठवत असेल. प्रेक्षकांनी आमिर आणि सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतल्यानंतर या चित्रपटाचा सिक्वलही आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकतेच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत अंदाज अपना अपनाच्या सिक्वलचे लेखक दिलीप शुक्ला यांनी या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दलची माहिती दिली आहे. सलमान आणि आमिरचीच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या भागानंतर २५ वर्षांनी येणाऱ्या चित्रपटाच्या सिक्वलमध्येही वर्णी लागली आहे.

पण या दोघांव्यतिरिक्त इतरही तीन नवीन कलाकार या नव्या चित्रपटात असणार आहेत, ज्यांची नावे अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत. आता कोणत्या नव्या कलाकारांची चित्रपटाच्या सिक्वलमध्ये वर्णी लागणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आमिर आणि सलमानचे चाहते आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Comment