नव्या जर्सीसह टीम इंडियाचे फोटोशूट


भगव्या रंगातील जर्सीमधील कर्णधार विराट कोहली, एमएस धोनी, हार्दिक पांड्या यांच्यासह अन्य भारतीय खेळाडूंनी फोटो शूटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. रविवारी आईसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सामना होणार आहे. आईसीसीकडून याच पार्श्वभुमीवर खेळाडूंच्या फोटो शूटचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.


भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रिषभ पंत, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक, केदार जाधव, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल आणि एमएस धोनी सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओत या भगव्या जर्सीमध्ये दिसून येत आहेत.

भगव्या रंगावर बीसीसीआयने नुकतेच शिक्कामोर्तब केले आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचे अधिकृत पोशाख प्रायोजक, नाईकी यांनी देखील रविवारी इंग्लंडविरुद्ध आयसीसी विश्वचषक सामन्यासाठी भारतीय संघ भगव्या आणि निळ्या जर्सीमध्ये खेळत असल्याची पुष्टी दिली आहे.

Leave a Comment