धोनीच्या ‘सुपरमॅन’ कॅचची सोशल मीडियावर जोरदार चर्चा


आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये भारताने सर्व सामन्यात विजय मिळवला असून, गुणतालिकेत देखील भारत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताची पुढील लढत आता 30 जून रोजी यजमान इंग्लंडबरोबर होणार आहे. याआधीच्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिज संघाचा मोठ्या फरकाने पराभव केला. याच मॅचमधील विकेटकिपर महेंद्रसिंह धोनीने घेतलेला एक अफलातून झेल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर धोनीच्या झेलची जोरदार चर्चा सुरू आहे.


वेस्ट इंडिजविरूध्दचा सामन्यात जसप्रित बुमराहच्या गोलंदाजीवर धोनीने शानदार डाईव मारत कार्लोस ब्रेथवेटचा कॅच पकडला. सोशल मीडियावर धोनीच्या कॅचचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. धोनीचा हा कॅच बघून स्लिपमध्ये उभा असलेले रोहित शर्मा देखील आश्चर्यचकित झाला. सोशल मीडियावर धोनीच्या फॅन्सनी या कॅचची जोरदार प्रशंसा करत, त्याला थेट सुपरमॅनप्रमाणे कॅच घेतानाचा फोटो शेअर केला.

धोनीने या सामन्यात 56 धावांची नाबाद खेळी देखील केली. शेवटच्या ओव्हरमध्ये ताबडतोड 16 धावा देखील ठोकल्या.

Leave a Comment