दोन दिवसाच्या 99 कप चहा आणि 25 कप कॉफीचे तब्बल 1.50 लाख रूपये बिल


नागपूर – दोन दिवसात 3 जण किती चहा आणि कॉफी पिऊ शकतात याचा जरा अंदाज बांधून पहा. पण आम्ही आज जी बातमी तुम्हाला देणार आहोत, ती वाचल्यावर बहुतेक तुम्हाला राग देखील येईल. कारण तिघाजणांचे दोन दिवसाच्या चहा आणि कॉफीचे बिल चक्क 1.50 लाख रुपये झाले आहे. 3 लोक नागपूर युनिव्हर्सिटीतील बोर्ड ऑफ स्टडीजच्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च त्यावेळी मागितला गेला. तब्बल 1.50 लाख रूपयांचे बिल तेव्हा पाठवले गेले. 2 दिवसामध्ये या तीन लोकांनी 99 कप चहा आणि 25 कप कॉफी मागवल्या होत्या. तब्बल 1.50 लाख रूपये या चहा, कॉफीचे बिल झाले आहे. पण, कुलगुरूंनी बिलाला मंजूरी देण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर चौकशीचे देखील आदेश दिले आहेत.

दरम्यान, कुलगुरूंनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कारण, कुलगुरू एस. पी. काणे यांच्याकडे बिल मंजूरीसाठी पाठवले गेले. तेव्हा त्यांना देखील बिलाची रक्कम पाहून धक्का बसला. शिवाय, बिलाबाबत बोर्डाकडे स्पष्टीकरण देखील मागितले गेले आहे.

दरम्यान, संबंधित विभागाला 1.50 लाखाच्या बिलाबाबत बिल खरे असल्याचे सिद्ध करा असे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय, 3 लोकांनी 99 कप चहा आणि 25 कप कॉफी मागितली होती का? अशी देखील विचारणा करण्यात आली आहे. मे महिन्यामध्ये बोर्ड ऑफ स्टडीजची बैठक ही आयोजित करण्यात आली होती. अभ्यासक्रमाबाबत यावेळी चर्चा झाली होती. या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या प्राध्यापकांसाठी चहा, नाश्ता मागवण्यात आला होता. त्याचे बिल 1.50 लाख रूपये झाले आहे.

Leave a Comment