ही स्टारकिड करत आहे के. एल. राहुलला डेट


मुंबई : सध्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा सलामीवीर के एल राहुल व्यस्त आहे. राहुल सध्या भारताकडून सलामीला फलंदाजीला शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे येतो. एकीकडे विश्वचषक स्पर्धेमध्ये टीम इंडिया दमदार कामगिरी करत असताना, वेगळ्याच कारणाने के एल राहुल चर्चेत आला आहे. अभिनेता सुनील शेट्टीच्या मुलीशी के एल राहुलचे नाव जोडले जात आहे.

क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या रिलेशनची चर्चा नवी नाही. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने लगीनगाठ बांधली. तर हेजल कीचसोबत युवराज सिंहने, सागरिका घाटगेसोबत झहीर खानने विवाह केला. आता या यादीत के एल राहुलचे नाव जोडले जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात ‘बॉलिवूड लाईफ’ने दिलेल्या वृत्तानुसार सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीला के एल राहुल डेट करत आहे.

View this post on Instagram

…n i’m so good with that 💛

A post shared by 🦋Kanch (@akansharanjankapoor) on


अनेकवेळा राहुल आणि अथिया दोघेही एकत्र दिसले होते. दोघांचे प्रेमप्रकरण फेब्रुवारी महिन्यापासून सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांची कॉमन फ्रेंडने सोशल मीडियावर दोघांचा एक फोटोही शेअर केला आहे. राहुल आणि अथिया या फोटोत सोबत दिसतात. आकांक्षा रंजन या कॉमन फ्रेंडने या दोघांची भेट करुन दिली होती. सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो एप्रिल महिन्यातील आहे. या फोटोवरुन चर्चेला उधाण आलं आहे. सध्या या चर्चांना दोघांकडूनही काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Leave a Comment