अॅपलची साथ सोडणार जॉनी आईव्ह


कॅलिफोर्निया : अॅपल कंपनीला यशाच्या शिखरावर नेण्यात बहुमूल्य योगदान देणारे त्याचबरोबर अॅपलच्या विविध उत्पादनांना खास डिझाईनद्वारे आकार देणारे डिझायनर जॉनी आईव्ह यांनी अॅपलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आईव्ह गेली 30 वर्षे अॅपलसाठी काम करत आहेत.

जॉनी आईव्ह यांनी 1998 साली आयमॅक डिझाईन केल्यानंतर 2001 साली आयपॉड, 2004 मध्ये आयपॉड मिनी, 2007 मध्ये आयफोन, 2008 मध्ये मॅकबुक एअर, 2010 मध्ये आयपॅड, 2015 मध्ये अॅपल वॉच या उत्पादनांचे डिझाईन आईव्ह यांनी केले आहे. एवढ्या इतक्या चांगल्या डिझाईन्सची उत्पादने अॅपलसाठी बनवणारे आईव्ह अॅपलमधून बाहेर पडणार असल्यामुळे आता अॅपलच्या उत्पादनांचे डिझाईन्स कोण बनवणार? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. परंतु यामध्ये चिंतेची बाब नाही. कारण अॅपलमधून बाहेर पडून जॉनी आईव्ह स्वतःची लव्हफ्रॉम नावाची डिझाईन कंपनी सुरु करणार आहेत. लव्हफ्रॉम ही कंपनी आता अॅपलच्या उत्पादनांचे डिझाईन करणार आहे.

Leave a Comment