ई-कॉमर्स क्षेत्रात ‘इन्स्टाग्राम’ही उतरणार


सॅन फ्रान्सिस्को : ‘अमेझॉन’ ही कंपनी सध्याच्या घडीला ई-कॉमर्स क्षेत्रात आघाडीवर आहे, हे तर तुम्हाला माहितच आहे. पण आता लवकरच फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म ‘इन्स्टाग्राम’ ही लवकरच ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. याची घोषणा इन्स्टाग्रामचे नवे प्रमुख एडम मुसेरी यांनी केली आहे. सध्या जगभरात इन्स्टाग्रामचे १० लाख युझर्स आहेत. मुसेरी यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कार्यभार हाती घेतल्यानंतर एका सार्वजनिक मंचावर बोलताना, दुकानदार – विक्रेते आणि इन्स्टाग्राम युझर्सच्या मोठ्या संख्येला जोडण्याचा आपला उद्देश असल्याचे म्हटले होते.

या संदर्भात एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एका सेल्स पोर्टलमध्ये फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेला ‘इन्स्टाग्राम’ला बदलण्याची मुसेरी यांची योजना आहे. ई कॉमर्स क्षेत्रात सध्या काही कंपन्यांचा दबदबा आहे. चीनची अलीबाबा आणि जेडी डॉट कॉम तसेच अमेरिकन कंपनी अमेझॉन, ईबे आणि वॉलमार्टचा यामध्ये समावेश आहे. डायरेक्ट सेल्सचा पायलट प्रोग्राम मार्च महिन्यातच फोटो शेअरिंग ऍप ‘इन्स्टाग्राम’ने सुरू केला होता. परंतु, केवळ २० ब्रान्डपर्यंतच हा सीमित होता. या ब्रान्डमध्ये झारा, बरबेरी, मिशेल कोर्स, नाइकी, अदिदास, प्राडा, युनिक्लो, डिओर, ऑस्कर डे ला रेंटा आणि एच एन्ड एम इत्यादींचा समावेश आहे.

Leave a Comment