कोहलीने ओलांडला २० हजार धावांचा टप्पा


मँचेस्टर – इंग्लंड खेळल्या जात असलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात ३७ धावा करताच, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्याच बरोबर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावांचा टप्पा ओलाडणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान पटकवले आहे. या यादीत क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर पाहिल्या स्थानी तर राहुल द्रविड दुसऱ्यास्थानी आहे.

Leave a Comment