तुम्ही असे सोडवू शकता तुमचे स्मार्टफोनचे व्यसन


स्मार्टफोन हा सध्याच्या घडीला काळाची गरज बनत चालला आहे. पण स्मार्टफोनचा वापर सध्या गरजेपुरताच होतो असे नाही, आपण अनेकदा ऑफिसमधून घरी जाताना, खरेदी करताना, अगदी रस्ता ओलांडतानाही हातातला फोन न्याहळत असतो. त्यातील काही जण तर चहा पिताना किंवा जेवतानाही सतत फोनवर असतात.

आपण दिवसभर कितीही दमलो असू तरीही दर दोन मिनीटाला आपण आपला फोन चेक करायला विसरत नाही. आपले आयुष्य स्मार्टफोनने सोपे केले असले, तरी आपल्यापैकी अनेकांना या स्मार्टफोनचे व्यसन जडले आहे. अनेक जण सातत्याने याच व्यसनापासून दूर जाण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण आम्ही आज तुम्हाला ज्या काही टीप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे मोबाईलचे व्यसन सोडवण्यास मदत होईल.

यासंदर्भात एम्सने केलेल्या एका अभ्यासानुसार, मोबाईलचे व्यसन जवळपास 14 टक्के लोकांना जडले आहे. या सर्व लोकांना तात्काळ उपचाराची गरज होती. मोबाईल व्यसन जडणाऱ्या लोकांमध्ये कमीतकमी 3 ते जास्तीत जास्त 6 लक्षणे अतिवापराची दिसणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये जर मोबाईलच्या अतिवापराची 3 लक्षण आढळली, तर मोबाईलचे व्यसन त्याला जडले असे डॉक्टरांचे मत आहे. विशेष म्हणजे या अभ्यासानुसार जवळपास 19 टक्के लोक इच्छा असूनही मोबाईलच्या व्यसनापासून दूर जाऊ शकत नाही.

तसेच 24.8 टक्के लोक त्यांच्याकडे मोबाईल नसल्यावर त्यांना काहीतरी चुकल्यासारखे वाटते. तर 21.4 टक्के लोकांना मोबाईलचे अक्षरश: वेड लागल्याचे सांगितले. विशेष म्हणजे 19.4 टक्के लोक इच्छा असूनही मोबाईलपासून दूर जाण्याची इच्छा असूनही त्यांना दूर जाता येत नाही. तर याबाबत 19.7 लोकांना प्रश्न विचारला असता, त्यांनी तात्काळ त्यांना स्मार्टफोनचे व्यसन इतके व्यसन जडले आहे की त्यांनी इतर कोणत्याही गोष्टीचा मोह होत नाही. त्याचबरोबर मोबाईलच्या वापरामुळे जवळपास 13 टक्के लोक कौटुंबिक नात्यांकडे दुर्लक्ष करतात.

मोबाईलचे व्यसन जडण्याच्या फार गोष्टी आहेत. याआधी स्मार्टफोन आणि इंटरनेट जेव्हा अस्तित्वात नव्हते, तेव्हा मैदानी खेळ खेळायचे किंवा गॉसिपिंग सर्वसामान्य लोक व्यस्त राहण्यासाठी करायचे. या व्यतिरिक्त काही जण वाचन करणे, लेख लिहिणे, रंगरंगोटी करणे, गाणी गाणे, नृत्य करणे, वृक्षारोपण करणे यांसारखे छंद जोपासण्यास वेळ द्यायचे. त्यांचा मेंदू यामुळे कोणत्या ना कोणत्या कामात सतत व्यस्त राहायचा. पण आपण आता स्मार्टफोनच्या युगात सतत व्हॉट्सअप किंवा इतर मॅसिजिंग अॅपवर चॅटिंग करण्यात आपला वेळ घालवतो. तसेच अनेकदा व्हिडीओ किंवा फोटो स्क्रोल करत सतत पाहत असतो. यामुळे आपल्याला त्याची सवय लागते आणि नकळत आपल्याला मोबाईलचे व्यसन जडते.

स्मार्टफोन व्यसनापासून बाहेर पडण्यासाठी सर्वात प्रथम स्वत:वर संयम ठेवायला शिका. स्वत:ला स्मार्टफोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून थोडे दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमचा जास्तीत जास्त वेळ तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत घालवा. यामुळे तुम्ही काही काळ मोबाईलपासून दूर राहाल. फोनचा वापर गरज पडल्यास करा. अन्यथा फोनचा वापर शक्य तितका टाळा दिवसभर ऑनलाईन राहण्यापेक्षा कामापुरती गरज असतानाच ऑनलाईन रहा. स्वत:ला रिलॅक्स ठेवण्यासाठी काही काळ वॉकला जा किंवा ज्या गोष्टीत तुम्ही रमता ती गोष्ट करा.

Leave a Comment