सोनाक्षीने शेअर केला दबंग३ च्या सेटवरील फोटो


सलमान खानच्या ‘दबंग’ आणि ‘दबंग २’ या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या तुफान यशानंतर या चित्रपटाचा तिसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इतर दोन्ही भागांप्रमाणेच ‘दबंग ३’ असं शीर्षक असलेल्या या चित्रपटात सलमान आणि सोनाक्षीची जोडी झळकणार आहे.

सोनाक्षीचा या चित्रपटातील एक फोटो काही दिवसांपूर्वीच शेअर करण्यात आला होता. ती चित्रपटात सलमानच्या पत्नीची म्हणजेच रज्जो ही भूमिका साकारणार आहे. सोनाक्षीने आता चित्रपटाच्या सेटवरील आणखी एक फोटो आपल्या इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.

सोनाक्षी या फोटोत काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. तर तिच्या केसांची वेणी आणि मेकअप प्रेक्षकांची मने जिंकत आहे. सोनाक्षी इतर दोन्ही भागांप्रमाणेच यावेळीही प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. प्रभूदेवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. तर चित्रपटाची निर्मिती सलमान खान आणि अरबाज खान यांच्या प्रोडक्शन हाऊसद्वारे करण्यात येणार आहे. हा चित्रपट यंदाच्या डिसेंबरमध्ये २० तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment