मुंबई – न्यायवैद्यकीय चाचणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेला संशयित शरद कळसकर याची करण्यात आली. त्याने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची कबुली त्यात दिली. कळसकरने सीबीआयने केलेल्या न्यायवैद्यकीय चाचणीत मी व सचिन अंदुरेने गोळीबार केला असे म्हटले आहे.
शरद कळसकरची न्यायवैद्यकीय चाचणीत दाभोलकरांवर गोळया झाडल्याची कबुली
मंगळवारी विशेष न्यायालयात सीबीआयकडून या संबंधीचा अहवाल सादर करण्यात आला. न्यायवैद्यकीय चाचणीत त्याचे वकील संजीव पुनाळेकर यांचे सुद्धा नाव शरद कळसकरने घेतले आहे. वकील संजीव पुनाळेकर सुद्धा डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत आहेत. संजीव पुनाळेकर यांना रविवारी पुणे न्यायालयाने सहा जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मी मागच्यावर्षी जून महिन्यात पुनाळेकर यांची भेट घेतली होती. त्यांनी त्यावेळी मला दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता अशी कबुली कळसकरने न्यायवैद्यकीय चाचणीत दिला आहे. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने २५ मे रोजी अटक केली.
सीबीआयकडून फेब्रुवारी २०१९ मध्ये विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रासोबत न्यायवैद्यकीय चाचणीचा अहवाल जोडण्यात आला होता. सीबीआयचे विशेष सरकारी वकील अॅड. प्रकाश सुर्यवंशी यांनी मंगळवारी या अहवालाचा आधार घेऊन बाजू मांडली.