लंडन – टीम इंडियाने सध्या इंग्लंड येथे चालू असलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत असून टीम इंडिया आतापर्यंत सध्यातरी अपराजित राहिली आहे. या स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने या विश्वचषकातील पहिली हॅट्ट्रिक नोंदवली.
शमी हा भारतासाठी विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज आहे. यापूर्वी भारताच्या चेतन शर्माने १९८७ च्या विश्वषचकात हॅट्ट्रिक केली होती. क्रिकेट विश्वचषकामध्ये हॅट्ट्रिक नोंदवणारा शमी हा नववा गोलदांज आहे.
या दिग्गज गोलंदाजांनी आतापर्यंत विश्वचषकात साधली आहे हॅट्ट्रिक
श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा असा’ एकमेव गोलंदाज आहे ज्याने आजवर विश्वचषकात दोनदा हॅट्ट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे. मलिंगाने २००७ आणि २०११ च्या विश्वचषक स्पर्धेत हॅट्ट्रिक घेतली होती.