नवी दिल्ली- 1984 बॅचचे आयपीएस अधिकारी सामंत गोयल यांची केंद्र सरकारने रॉ (RAW) च्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर गुप्तचर संस्थेच्या संचालकपदावर आयपीएस अधिकारी अरविंद कुमार यांची नियुक्ती केली आहे.
‘रॉ’च्या प्रमुखपदी सामंत गोयल यांची नियुक्ती
बालकोट एअर स्टाईकची पूर्ण योजना पंजाब कॅडरमधील आयपीएस अधिकारी सामंत गोयल यांनी आखली होती. विद्यमान रॉ चे प्रमुख अनिल कुमार धस्माना यांच्याकडून सामंत गोयल हे पदभार स्वीकारतील.पंजाबमध्ये 1990 च्या दशकात उग्रवाद्यांनी दहशत माजवली होती सामंत गोयल यांनी त्याच्याविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु केले होते.
तर दुसरीकडे गुप्तचर संस्थेचे नवनियुक्त संचालक अरविंद कुमार हे काश्मीर प्रश्नाचे अभ्यासक आहेत. ते सध्या काश्मीर प्रकरणातील विभागातील विशेष सचिव म्हणून काम पाहतात. सामंत गोयल यांच्याप्रमाणे अरविंद कुमार हे 1984 बॅचमधील आसाम-मेघालय कॅडरमधील आयपीएस अधिकारी आहेत.