बॉक्स ऑफिसवर कबीर सिंहची रेकॉर्डब्रेक कमाई


मागील आठवड्यात बॉक्स ऑफिसवर शाहिद कपूर आणि कियारा अडवाणीचा बहुचर्चित चित्रपट ‘कबीर सिंह’ प्रदर्शित झाला आहे. याच चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. शाहिदने मोठ्या कालावधीनंतर ‘कबीर सिंह’च्या रुपाने एक सुपरहीट चित्रपट दिला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालतो आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी (शुक्रवारी ) कबीर सिंहने 20.21 कोटी रुपयांची कमाई करत शानदार ओपनिंग मिळवली. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी चित्रपटाच्या कमाईत अजून वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. चित्रपटाने शनिवारी 22.71 कोटी आणि रविवारी 27.91 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाची घौडदौड विकेण्डनंतरही सुरुच आहे. चित्रपटाने सोमवारी 17.54 कोटी आणि मंगळवारी 16.53 कोटी रुपयांची कमाई केली.

‘कबीर सिंह’ने अवघ्या पाच दिवसात 100 कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. ‘कबीर..’ने पाच दिवसात मिळून 104.90 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या आठवड्यातील पुढील पाच दिवसात चित्रपट जोरदार कमाई करेल, असा विश्वास समीक्षकांनी व्यक्त केला आहे. चित्रपट व्यापार विश्लेशकांनी ‘कबीर..’ला ब्लॉकबस्टर घोषित केले आहे.

Leave a Comment