नेटफ्लिकसच्या ‘गिल्टी’मध्ये कियाराची वर्णी


२०१४ मध्ये आलेल्या ‘फगली’ चित्रपटातून अभिनेत्री कियारा अडवाणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला ‘एम.एस. धोनी’ या चित्रपटाने खरी ओळख मिळवून दिली. कियारा सध्या पुन्हा एकदा आपल्या ‘कबीर सिंह’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात भले ही तिची भूमिका थोडकीच असली तरी तिने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता ती आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे.


कियाराची नेटफ्लिकसच्या ‘गिल्टी’ या चित्रपटात वर्णी लागली आहे. तिने याआधीही नेटफ्लिकसच्या ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटात भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत यात विकी कौशलही झळकला होता. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनद्वारे ‘गिल्टी’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.

या चित्रपटाची माहिती नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या ट्विटरवरून दिली आहे. नेटफ्लिकसच्या या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान या चित्रपटात कियाराशिवाय आणखी कोणत्या कलाकारांची वर्णी लागली आहे, याबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Leave a Comment