पुणे – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा पराभव करणार असल्याचे वक्तव्य केले. त्याकरिता आपण दर १५ दिवसांनी बारामतीला जाणार असून, मतदारसंघातील कमकुवत दुव्यावर काम करणार असल्याचेही पाटील म्हणाले. या विधानसभेला ‘आपकी बार 220 पार’ हाच नारा असल्याचे पाटील म्हणाले.
पुढच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा पराभव निश्चित – चंद्रकांत पाटील
तसेच भाजप आणि शिवसेनेची आगामी विधानसभेसाठी युती निश्चित झालेलीच आहे. जागावाटपाबाबत 50-50 चा फॉर्मुला हाच मूळ गाभा असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. जागा वाटपाबाबत बैठकीला बसल्यानंतर कुठली जागा कुणाला सोडायची याबाबत चर्चा करून तोडगा काढला जाईल असेही पाटील म्हणाले. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाने हुरळून जाऊ नका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या वेगवेगळ्या असतात. लोक विधानसभेवेळी वेगळा विचार देखील करत असतात. त्यामुळे गाफील राहू नका असा सल्लाही पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.