आयकर विभागाच्या रडारावर आला वर्षाला ६० ते ७० लाख कमवणारा कचोरीवाला


उत्तर प्रदेश – आयकर विभागाच्या रडारावर वर्षाला ६० ते ७० लाख कमवणारा कचोरीवाला आला असून आयकर खात्याला कचोरीवाल्याची वर्षिक कमाई पाहून जाग आली. त्यानंतर कचोरी वाल्याला आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. तब्बल ६० लाखांपेक्षा जास्त अलीगढमधील छोट्याशा गल्लीमध्ये कचोरी विकणारा मुकेश कुमार या व्यावसायिकाची वार्षिक उलाढाल आहे. पण अद्याप एक रुपयांचाही कर कधीच त्याने सरकारकडे भरलेला नाही.

मुकेश कुमार यांच्या लाखोंच्या उलाढालीविषयी अलीगढ आयकर विभागाला माहिती मिळाली. दररोज कचोरीच्या व्यवसायातून मुकेश हजारो रूपयांची कमाई करत असल्याचे कर आधिकाऱ्यांना समजल्यानंतर मुकेशच्या छोट्या दुकानावर आयकर विभागाने छापा टाकला. व्यावसायिक मुकेश कुमार लखपती असल्याचे या छाप्यामध्ये निदर्शनास आले. पण अद्याप त्याने वस्तू व सेवा कर नोंदणी क्रमांकही घेतलेला नसल्याचे दिसून आले. आयकर विभागाने कारवाईनंतर मुकेशला नोटीस पाठवली आहे.

गेल्या दहा ते १२ वर्षांपासून मुकेश कुमार अलीगढमध्ये सीमा टॉकीजजवळ कचोरी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. मुकेशच्या दुकानावर सुरुवातीला आम्ही नजर ठेवली होती. आम्हाला दुकानात नेमका किती व्यवसाय होतो याची माहिती पाहिजे होती. आम्ही त्याची वार्षिक उलाढाल आणि नोंदणी क्रमांकही नसल्याचे समजल्यावर छापा मारला. कारवाई दरम्यान मुकेश कुमार यांनी स्वतःच ते दिवसाला किती रुपये कमावितात, याची माहिती दिल्याचे अलीगढचे व्यावसायिक कर विभागाचे उपायुक्त रविंद्रपाल सिंग यांनी सांगितले.

Leave a Comment