गुगल प्ले स्टोअरमध्ये 2 हजारांपेक्षा अधिक बनावट अ‍ॅप्स


नवी दिल्ली – गुगल प्ले स्टोअरमध्ये 2 हजारांपेक्षा अधिक बनावट अ‍ॅप्स असल्याचे एका संशोधनाद्वारे समोर आले आहे. गेल्या 2 वर्षाच्या केलेल्या अभ्यासात ही बाब यूनिवर्सिटी सिडनी एन्ड सीएसआयआरओ डेटा 61 ने समोर आणली आहे. प्ले स्टोअरमध्ये अनेक असे प्रसिद्ध अ‍ॅप्स आहेत ज्यांचे बनावट व्हर्जन उपलब्ध आहेत. गुगल प्ले स्टोअरवर टेंपल रन, फ्री फ्लो आणि हिल क्लाइंब रेसिंगसारखे अनेक अ‍ॅप्सचे बनावट व्हर्जन उपलब्ध असल्याचे या संशोधनात समोर आले आहे. 12 लाख अ‍ॅप्सची तपासणी या अभ्यासात करण्यात आली आहे.

या संस्थेने आपल्या संशोधनात असे नमूद केले आहे की, खऱ्या अ‍ॅप्स सारखे हे बनावट अ‍ॅप्स दिसत असून यात अनेकदा मोबाईल ग्राहकांकडून गडबड होते. बनावट अ‍ॅप्स डाऊनलोड केल्यानंतर ते कळून येतात पण डाऊनलोड न करता तांत्रिक तज्ज्ञाशिवाय कोणालाही हे अ‍ॅप्सओळखता देखील येणार नाहीत.

संशोधनात असे स्पष्ट केले गेले आहे की, अनेकदा मोबाईलमधील डेटा या अशा बनावट अ‍ॅप्समुळे चोरण्याचा अथवा हॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. मोबाईल युजर्सना अशा अ‍ॅप्सच्या वापरामुळे आर्थिक नुकसान तसेच डेटा चोरी होण्याचा धोका कायम असतो.

गुगलने याविषयी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या उत्तरात सांगितले की, जेव्हा आम्हाला कधी मोबाईल युजर्सकडून अशाप्रकारची तक्रार येते किंवा कोणताही अ‍ॅप्स गुगलने दिलेल्या पॉलिसीचे उल्लंघन करत असेल तर आम्ही तातडीने ते अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरुन काढून टाकतो.

जवळपास 2 हजार 40 अ‍ॅप्स असे आहेत की ते प्रसिद्ध असलेल्या 10 हजार अ‍ॅप्ससारखेच दिसतात. युजर्सच्या मोबाईलवर परिणाम करणे हे यातील 49 हजार 608 अ‍ॅप्सचे उद्दिष्ट असते. तसेच 1 हजार 565 अ‍ॅप्स अशी परवानगी मागते ती खरे अ‍ॅप्सही मागत नसल्यामुळे अशा अ‍ॅप्सपासून सावधान राहणे गरजेचे आहे अन्यथा तुमचा मोबाईलही हॅक होऊ शकतो.

Leave a Comment