रामदास आठवले यांच्यासमोर राखीचा सिल्व्हर अवतार


बॉलीवूडची ड्रामा क्वीन अर्थात अभिनेत्री राखी सावंत नेहमीच आपली वक्तव्य, करामती, अभिनयामुळे सतत चर्चेत असते. त्याचबरोबर तिने बोल्ड फोटोज, सेक्सी व्हिडीओ, अंगप्रदर्शन यांच्या जोरावर स्वतःचा असा चाहता वर्ग निर्माण केला आहे.


सोशल मीडियावर राखी सावंत फारच सक्रिय आहे. या ड्रामा क्वीनने आता आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. राखी यामध्ये चक्क केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत एकाच मंचावर दिसून येत आहे. तर रामदास आठवले आणि राखी यांना एकच हार घातल्याचे एका फोटोमध्ये पाहायला मिळते.

View this post on Instagram

MUA- @nishachandnanii

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on


केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मुलाला रिपब्लिकन पार्टीचा लीडर बनवल्यानंतरच्या कार्यक्रमातील हे फोटो आहेत. राखी यामध्ये पूर्णतः सिल्व्हर लुकमध्ये दिसून आली. सध्या सोशल मीडियात साडी नेसलेल्या राखीचा मेकअप आणि दागिने याची चांगलीच चर्चा रंगली आहे.


राखीने या कार्यक्रमावेळी अगदी दिलखुलासपणे रामदास आठवले यांची तारीफ केली. तर दुसरीकडे पहिल्यांदाच युजर्स राखीबद्दल चांगले बोलताना दिसत आहेत. या लुकची अनेक युजर्सनी तारीफ केली आहे.

Leave a Comment