विश्वचषक स्पर्धेत पुन्हा एकदा रंगू शकतो भारत-पाक सामना


मुंबई – भारतीय संघाने आपल्या जबरदस्त फॉर्मच्या जोरावर आपले 5 पैकी 4 सामने जिंकत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. लीग स्टेजमध्ये आपल्या परांपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानला भारताने सातव्यांदा पराभूत केले. विश्वचषक स्पर्धेतील हा सामना काहीसा एकतर्फी राहिला. सुरुवाती पासूनच भारताने पाकिस्तानवर वर्चस्व बनवूत 89 धावांनी त्यांचा पराभव केला. पण याच स्पर्धेत पुन्हा एकदा भारत-पाक संघात अजून एक सामना खेळला जाऊ शकतो.

गुणतालिकेत भारत सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे तर सातव्या क्रमांकावर पाकिस्तान असून आपले उर्वरित सामने भारतीय संघ जिंकून पहिले स्थान प्राप्त करू शकतो तर आपले उरलेले सामने जिंकून पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो. मागील सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा केल्याने पाकिस्तानी संघाचे आता 6 सामन्यात 5 गुण आहे. त्यांचा सामना आता न्यूझीलंड, बांगलादेश आणि अफगाणिस्तान टीमशी होईल. त्यांनी जर सर्व तीन सामने जिंकले तर त्यांचे 11 गुण होतील. त्याचबरोबर या तीन संघाच्या कामगिरी वरही त्यांचे लक्ष असेल. पाकिस्तान संघाने सेमीफाइनलसाठी पात्र ठरण्यासाठी आशा करावी कि एक पेक्षा जास्त सामना इंग्लंड जिंकू नये आणि बांगलादेश आणि श्रीलंकाने प्रत्येकी एक-एक सामना गमवावा. दुसरीकडे, सेमीफायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला दोन सामने जिंकण्याची गरज आहे.

भारताचा पुढील सामना वेस्ट इंडिज संघाशी 27 जुलैला होईल तर बलाढ्य न्यूझीलंडशी 26 जुलैला पाकिस्तानचा सामना एजबस्टन येथे खेळाला जाईल. आता पर्यंत विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि न्यूझीलंड संघाने एकही सामना गमावला नाही आहे. या दोन संघामधील सामना पावामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही संघाना एक-एक गुण देण्यात आले होते.

Leave a Comment