तुरुंगाबाहेर येणार बलात्कारी दोषी राम रहिम ?


नवी दिल्ली: 20 वर्षांची शिक्षा बलात्काराच्या 2 प्रकरणांमध्ये भोगत असलेला गुन्हेगार राम रहिम तुरुंगातून बाहेर येण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असून त्याला हरियाणा सरकार देखील सहकार्य करत असल्याचे बोलले जात असल्यामुळे राम रहिम कायदा धाब्यावर बसवून तुरुंगाबाहेर आल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी स्थिती तयार झाली आहे.

गुरमीत राम रहीमला पॅरोल देण्याला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, तुरुंग मंत्री कृष्ण पवार आणि आरोग्य मंत्री अनिल विज यांनी स्वतः समर्थन दिले आहे. अनिल विज यांनी तर गुरमीत राम रहिमला सामान्य व्यक्तीचा अधिकार पॅरोल मिळायला हवा, तो त्याचा अधिकार आहे, असेही म्हटले.

नियमांनुसार पॅरोल 2 वर्ष शिक्षा भोगल्यानंतरच दिला जाऊ शकतो. पण, 2 वर्ष पूर्ण होण्याआधीच गुरमीत राम रहिमने पॅरोलसाठी अर्ज केला आहे. दुसरीकडे राम रहिम ज्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे त्या तुरुंग प्रशासनाने देखील शिक्षेची अट पूर्ण केलेली नसतानाही त्याचा अर्ज स्वीकारला आहे. यावरुन राम रहिमचा दबदबा अजूनही शिल्लक असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment