आता जपानी भाषेत प्रदर्शित होणार केसरी


भारतातील प्रेक्षकांनी अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या केसरी चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतल्यानंतर हा चित्रपट आता जपानमधील प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झाला आहे. हा चित्रपट जपानमध्ये १६ ऑगस्टला रिलीज होणार आहे.


चित्रपटाचे एक पोस्टर अक्षय कुमारने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. ‘केसरी’ हा चित्रपट सारागढीच्या लढाईवर आधारित आहे. १० हजार अफगाणींविरोधात २१ शिख सैनिकांनी दिलेल्या लढ्याची कथा ‘केसरी’मध्ये आहे.

अक्षय कुमारने अनुराग सिंह दिग्दर्शित या चित्रपटात इशर सिंह यांची भूमिका साकारली आहे. तर यात अक्षयच्या पत्नीची भूमिका परिणीती चोप्राने साकारली आहे. भारतात या चित्रपटाने केवळ ७ दिवसातच १०० कोटींचा गल्ला पार केला होता. अशात आता जपानी प्रेक्षकांची मने जिंकण्यात हा चित्रपट यशस्वी ठरतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment