भारत विरुध्द पाक सामन्यामुळे हॉटस्टारने रचला नवा विक्रम


नवी दिल्ली – क्रिकेट रसिकांसाठी भारत विरुध्द पाकिस्तानचा सामना हा नेहमीच आवडीचा विषय असतो. चाहते या सामन्याची आवर्जून वाट पाहत असतात. भारत विरुध्द पाकिस्तान सामना सध्या इंग्लडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत मँचेस्टरच्या मैदानावर पार पडला. भारताने हा सामना डकवर्थ लुईस नियमाने ८९ धावांनी जिंकला.पण तब्बल १० कोटी लोकांनी हा हायव्होल्टेज मुकाबला ‘हॉटस्टार’च्या लाईव्ह स्ट्रीमिंग अॅपवर पाहिला. हॉटस्टार’च्या इतिहासात हा विक्रम बनला आहे.

१६ जून रोजी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत विरुध्द पाकिस्तान या दोन संघातील सामना पार पडला. तब्बल १० करोड लोकांनी हा सामना हॉटस्टारवर पाहिला. विशेष म्हणजे हा सामना तब्बल ६६ टक्के ग्रामीण भागातील लोकांनी हॉटस्टारवर पाहिला. आयसीसी विश्वचषक स्पर्धेचे हॉटस्टार या अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात येत आहे. या सामन्यांचे इंग्लिश, हिंदी , बांगला, तमिळ, तेलगू, आणि कन्नड या भाषांमध्ये प्रक्षेपण करण्यात येत आहे.

Leave a Comment