‘या’ चित्रपटात जमणार सिंघम आणि मुन्नाभाईची जोडी


बॉलीवूडचा सिंघम आणि मुन्नाभाई लवकरच पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहेत. आगामी ‘भूज द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटात अजय देवगण आणि संजय दत्त एकत्र भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून म्हणजे २५ जूनपासून सुरुवात होत आहे.

आजपासून या चित्रपटाचे शूटिंग हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये सुरू होणार आहे. अजय आणि संजय दत्तसोबत या चित्रपटात राणा दुगबत्ती, सोनाक्षी सिन्हा, परिणीती चोप्रा आणि अॅमी विर्क हे कलाकारही झळकणार आहेत. अभिषेक दुधय्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर हा चित्रपट पुढच्या वर्षी १४ ऑगस्टला प्रदर्शित होईल.

आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये अजय देवगन आणि संजय दत्त यांच्या जोडीने एकत्र काम केले आहे. त्यांनी ‘ऑल द बेस्ट’, ‘रास्कल्स’, ‘सन ऑफ सरदार’, ‘मेहबुबा’, यांसारख्या चित्रपटात एकत्र भूमिका साकारल्या आहेत. आता पुन्हा एकदा ‘भूज द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटातून ते एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाच्या टीमचा एक फोटो शेअर करुन याबाबतची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर केली आहे.

Leave a Comment