बिन्नी बन्सल यांनी ५३१ कोटींना विकले आपले शेअर


बंगळुरू – आपल्या मालकीचे कंपनीचे ५४ लाख शेअर देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल यांनी वॉलमार्टला विकले आहेत. ७६.४ दशलक्ष डॉलर (५३१ कोटी रुपये ) एवढी या शेअरची किंमत आहे. वॉलमार्टची उपकंपनी एलक्सेमबर्गने बिन्नी यांचे शेअर विकत घेतले आहेत. ५ लाख ३९ हजार ९१२ शेअर खरेदी करून फ्लिपकार्टमधील हिस्सा वॉलमार्टने वाढविल्याचे चेन्नईच्या पेपर व्हीसीने म्हटले आहे. ही संस्था वित्तीय डाटा कंपनी आहे.

वॉलमार्टला फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन व बिन्नी बन्सल या दोघांनी आपले शेअर विकले आहेत. सचिन यांनी यापूर्वीच वॉलमार्टला ७७ टक्के हिस्सा विकला आहे. वॉलमार्टने त्यासाठी सचिन यांना १६ अब्ज डॉलर दिले आहेत. त्यानंतर बिन्नी यांनी व्यवस्थापनाच्या टीमचे नेतृत्व केले आहे.

वॉलमार्टने बिन्नी यांची वैयक्तीक गैरवर्तणूक केल्याचा एका महिलेने आरोप केल्यानंतर चौकशी केली होती. बिन्नी यांनी त्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. वॉलमार्टकडून फ्लिपकार्टमध्ये भागीदारी घेतली जात असताना बिन्नी यांनी ११ लाख २२ हजार ४३३ शेअर विकले होते. फ्लिपकार्टमध्ये बिन्नी यांचा ३.८५ टक्के हिसा होता. शेअर विकल्याने त्यात ०.३३ टक्क्यांची घट होवून ३.५२ टक्के एवढा झाला आहे. फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टकडे असलेल्या आकडेवारीच्या तुलनेत या आकडेवारीत काही फरक असू शकतो, असे पेपर व्हीने म्हटले आहे.

Leave a Comment