
अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने दिग्दर्शिका झोया अख्तर यांच्या ‘गली बॉय’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने या चित्रपटात ‘एमसी शेर’ची तडफदार भूमिका साकारली होती. चित्रपटातील रणवीरसोबतच त्याच्या भूमिकेचेही फार कौतुक झाले. सिनेसृष्टीत तो नवोदित असुनही प्रेक्षकांवर त्याने साकारलेल्या भूमिकेची छाप पडल्यामुळे तो ‘गली बॉय’नंतर पुन्हा कोणत्या चित्रपटात दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती.
दुसऱ्या चित्रपटासाठी सज्ज ‘गली बॉय’चा ‘एमसी शेर’
अलिकडेच त्याच्या आगामी चित्रपटांबद्दलची माहिती सिद्धांतने दिली आहे. त्याने एका माध्यमाशी बोलताना सांगितले, की सध्या माझ्या हातात दोन प्रोजेक्ट्स आहेत. त्यापैकी एक अॅक्शनपट असणार आहे. मी त्यासाठी प्रशिक्षणही घेत आहे. तर, दुसरा चित्रपट हा विनोदी भूमिकेचा असेल.
‘गली बॉय’चा सिक्वेल काही दिवसांपर्वीच झोया अख्तर या बनवणार असल्याच्या चर्चा होत्या. सिद्धांत त्याबद्दल बोलताना म्हणाला की, हा चित्रपट दिल्लीच्या पार्श्वभूमीवर आधारित असेल. या चित्रपटाच्या कथानकावर सध्या झोया काम करत आहेत.
