या चिमुरडीने गायले ‘लग जा गले’चे क्यूट व्हर्जन


नव्या जोमाच्या कलाकारांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे वेगळेपण जगासमोर आणण्यास महत्वपूर्ण सहकार्य मिळत आहे. देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात असणारे असे काही चेहरे याच माध्यमातून प्रकाशझोतात येत आहेत, त्यातच दुसरा कोणताही मौल्यवान दागिना नसल्याचे यामुळे सिद्ध होत आहे.

त्यातच आता आपला लाडका सुप्रसिद्ध गायक सोनू निगमने असाच एक कलाकार चेहरा जगासमोर आणला आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवर सोनू निगमने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दिसणारा हा चेहरा सध्या अनेकांना आश्चर्यचकित करत आहे. कारण, एक चिमुकली, तिच्या बोबड्या स्वरांमध्ये ‘लग जा गले’ हे अतिशय कठिण गाणे अगदी सहजपणे सादर करत असल्याचे दिसत आहे.

‘वो कौन थी’, या चित्रपटातील हे मुळ गाणे गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गायले आहे. हे गाणे आज ही अनेकांच्याच पसंतीचे असल्यामुळे अतिशय श्रवणीय चाल असणारे हे गाणे गाण्यास फारच अवघड आहे. पण, ही चिरमुडी ज्या अंदाजात ते गाणे गात आहे, हे पाहता खुद्द सोनू निगम देखील आश्चर्यचकित झाला आहे.

त्याने तिची प्रशंसा करत या व्हि़डिओच्या कॅप्शनमध्ये ‘जरा या चिमुरडीला पाहा…. संगीत क्षेत्रात ती मोलाचे योगदान देणार आहे. ही खरंच दैवी देणगी आहे’. शिवाय कलाकार हा मुळात घडलेला असतो. इथे फक्त त्याला पैलू पाडण्याची गरज असते, असे म्हणत सोनूने एका खऱ्या कलाकाराविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. असंख्य व्ह्यूज त्याने पोस्ट केलेल्या या व्हिडिओ मिळाले आहेत, शिवाय पाच हजारांहून अधिकजणांनी तो शेअरही केला आहे.

Leave a Comment