सोनाक्षीने केला नावात बदल


आपल्या ट्विटर अकाऊंटवरील नावात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने बदल केला आहे. तिने, आपल्या ट्विटर अकाऊंटमधील सोनाक्षी हे नाव हटवून त्याठिकाणी बेबी बेदी असे नाव ठेवले आहे. त्याचबरोबर तिने आपला नवा प्रोफाईल फोटोही अपलोड केला आहे.


आता तुम्ही विचाराल की तिने आपल्या नावात बदल का केला? तर त्यामागे तिचा आगामी चित्रपट कारणीभूत आहे. आपल्या आगामी ‘खानदानी शफाखाना’ चित्रपटात सोनाक्षी बेबी बेदी नावाचे पात्र साकारणार आहे. तिने आपल्या ट्विटर अकाऊंटला याच पात्राचे नाव दिले आहे. तिने यासोबतच चित्रपटातील एक फोटो आपल्या प्रोफाईलला ठेवला आहे.

सोनाक्षीच्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला होता. सोनाक्षीशिवाय या चित्रपटात वरूण शर्मा, गायक बादशाह आणि अनू कपूर हेदेखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिल्पी दासगुप्ता यांनी केले असून हा चित्रपट येत्या २६ जुलैला रिलीज होणार आहे. दरम्यान याशिवाय सोनाक्षी सध्या आपल्या आगामी ‘दबंग ३’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

Leave a Comment