इमरान हाश्मीचा आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज


महानायक अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी दिग्दर्शक रुमी जाफरी यांच्या आगामी ‘चेहरे’ चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. अमिताभ बच्चन यांचा या चित्रपटातील लूक काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. आता चित्रपटातील इमरान हाश्मीचाही फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.


‘चेहरे’ हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असणार असून या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एन्टरटेन्मेंट अंतर्गत करण्यात येणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी २१ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटात कोणती अभिनेत्री दिसणार, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

आत्तापर्यंत बऱ्याच चित्रपटामध्ये इमरान हाश्मीने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याचा ‘व्हाय चीट इंडिया’ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, आता पुन्हा एकदा दमदार भूमिकेत इमरानला पाहायला मिळणार आहे.

Leave a Comment