शाहिद-कियाराच्या कबीर सिंहची बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग


कालच अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘कबीर सिंग’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकला. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासून ट्रेलरपर्यंत सगळ्याच गोष्टींना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे चित्रपटाला देखील चांगला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता आणि हा अंदाज आता खरा ठरला आहे.

शाहिदच्या कबीर सिंहची बॉक्स ऑफिसवरील पहिल्या दिवशीची कमाई समोर आली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर २०.२१ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाला शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा फायदा होणार आहे. त्यामुळे, पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीचे आकडे जास्त असतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान शाहिदच्या अभिनयाचे हा चित्रपट पाहून सिनेमागृहाबाहेर आलेल्या बहुतेक प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे. यासोबतच कियाराचा लूक आणि संदीप रेड्डींच्या मांडणीलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

Leave a Comment