हार्ले डेव्हिडसनची ही बाईक रॉयल एनफिल्डला देणार टक्कर


भारतीय बाजारात रॉयल एनफिल्डच्या बुलेटचा किती बोलबाला आहे हे तुम्हाला नव्याने सांगायला नको. त्यातच आता बुलेट दमदार प्रतिस्पर्धी मिळणार आहे. कारण 338cc इतकी क्षमता असलेली बाइक लॉन्च करण्याचा निर्णय अमेरिकन वाहन निर्माता कंपनी हार्ले डेव्हिडसनने घेतला आहे. नुकतीच तशी अधिकृत घोषणाही हार्ले डेव्हिडसन कंपनीने केली. या बाइकचे वैशिष्ट असे की, हार्ले डेव्हिडसन कंपनीकडून लॉन्च केली जाणारी ही सर्वात स्वस्त बाइक असणार आहे.

बाजारात हार्ले डेव्हिडसन कंपनीची ही बाइक थेट रॉयल एनफिल्डला टक्कर देईल. रॉयल एनफील्ड एन्ट्री लेवल बाइक्सची 350 सीसी एवढी इंजिन क्षमता ठेवते. याबाबत कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार चीनमध्ये या बाइकची निर्मिती केली जाणार आहे. या बाइकचे उत्पादन चीनमध्ये होणार असले तरी, चीनच्या शेजारील देशांमध्येही या बाइकची विक्री केली जाणार आहे.

चीननंतर दुचाकींची सर्वाधिक विक्री भारतात होते आणि थेट सांगायचे तर हार्ले डेव्हिडसन बाइकचे चाहते भारतात कमी नसल्यामुळे हार्ले डेव्हिडसनची बाइक जर स्वस्तात उपलब्ध झाली तर, ती बाजारात कमाल करेल असा विश्वास ऑटो क्षेत्रातील जाणकारांना वाटतो.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हार्ले डेव्हिडसन कंपनीने ही बाइक बनविण्यासाठी चीनी ब्रांड ‘Qianjang मोटरसायकल’ सोबत करार केला आहे. एक प्रोटोटाइप बाइकचा फोटोही या बाइकसाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे. ही बाईक दिसायलाही मॉडर्न नेक्ड बाइकसारखीच दिसते. पण, या बाईकमध्ये तुम्हाला हार्लेच्या क्रुजर लुकची कमतरता भासू शकते.

या बाईकमध्ये कंपनीने एलईडी हेडलँप, फूल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अॅण्टी लॉक ब्रेकिंग सिस्टम, डिस्क ब्रेक यांसारखी अनेक फिचर्स दिली आहेत. याशियाव फ्रंडला अपसाईड डाऊन फॉर्क आणि बॅकला मोनो शॉक सस्पेंशन द्यायचा प्रयोग करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार ही बाइक पहिल्यांदा चीनमध्ये लॉन्च होईल. त्यानंतर चीन शेजारील देशांमध्ये ही बाइक पाहायला मिळेल. ही बाइक 2020 पर्यंत मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment