किल्ले शिवनेरीवर सापडलेल्या दुर्मिळ वनस्पतीचे लवकरच नामकरण


पुणे – अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर एक दुर्मिळ वनस्पती सापडली होती. आता लवकरच ‘शिवसुमन’ असे ‘फ्रेरिया’ या दुर्मिळ वनस्पतीचे नामकरण करण्यात येणार आहे. 1865 साली पहिल्यांदा हे फूल ब्रिटीश वनस्पतीशास्त्रज्ञ निकोल अलेक्झांडर डॅझेल यांनी जगासमोर आणले होते.

या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘शिव सुमन’ या नावाला पुणे महानगरपालिका, स्वयंसेवी संस्था, आणि भारतीय वनस्पती सर्वेक्षण पुणे केंद्र यांच्यासह पर्यावरणप्रेमींनी संमती दिली आहे. ही वनस्पती रायगडावर स्वच्छता मोहिमेदरम्यान समोर आली होती. तसेच रायगडावर त्याची पन्नासहून अधिक रोपे रूजवण्यात आली आहेत.

फ्रेरिया ही दुर्मिळ वनस्पती शिव सुमन अशी नामांतरित करताना छत्रपतींच्या नावामधून ‘शिव’ आणि फूलाचा समानार्थी ‘सुमन’ या शब्दाची निवड करण्यात आली आहे. नाशिक, सातारा, रायगड, पुणे, अहमदनगर या भागात ही वनस्पती आढळते. या वनस्पतीला ‘Shindal Makudi’ म्हणून देखील ओळखले जाते.

Leave a Comment