सध्या डिजीटल युगाकडे वाटचाल करत असल्यामुळे आपली व्यसने देखील डिजीटल व्हायला लागली आहेत. जगभरातील जास्तीत जास्त लोक हे साधारण सिगारेट ओढतात. पण सध्याच्या घडीला ई-सिगारेटचे फॅड वाढतानाचे चित्र दिसत आहे. काही लोकांचा असा समज आहे ई-सिगारेट ओढल्याने आपल्या शरीर कमी प्रमाणात हानी पोहचते. पण हा त्यांचा गोडगैरसमज आहे हे वेगवेगळ्या संशोधनातून समोर आले आहे. त्यातच आता ई-सिगारेटशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
ई-सिगारेटचा झाला तोंडात स्फोट, अल्पवयीन मुलाच्या जबड्याचा चेंदामेंदा
अमेरिकेतील एक १७ वर्षांचा अल्पवयीन मुलगा ई-सिगारेट ओढत असतानाच त्यांच्या तोंडात अचानक ई-सिगारेटचा स्फोट झाला. त्याच्या जबड्याचा ई-सिगारेटच्या स्फोटामुळे पूर्णपणे चेंदामेंदा झाला आणि त्याचे सगळे दात तुटून बाहेर आले. सिगारेटचा एकाएकी स्फोट झाल्याने त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागले होते. त्याला त्वरित उटाह येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
याबाबत इतर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार सिगारेटच्या स्फोटानंतर पीडित तरूण आपातकालीन केंद्रात पोहोचला. येथे त्याच्या सिटी स्कॅनच्या रिपोर्टमधून समोर आले की, त्याच्या जबड्याचा चेंदामेंदा झाला आणि त्याचे काही दातही बाहेर आलेत. डॉ. केटी रसेल यांनी सीएनएनला सांगितले की, लोकांनी अशी उपकरणे घेण्याआधी पूर्ण तपासणी केली पाहिजे. असे उपकरणे त्यांच्यासाठी चांगले नाहीत.