सलमान खानचे हे दक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक खाऊन गेले भाव


रिमेक चित्रपटांचा ट्रेंड हा बॉलीवूडसाठी आता काही नवीन राहिलेला नाही. त्यातच अभिनेता सलमान खानचे अनेक चित्रपट हे दक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक होते. असे असतानाही त्याचे चित्रपट सुपर डुपर हीट ठरले आहेत. आज आम्ही तुम्हाला त्याच चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्या दक्षिणात्य चित्रपटांच्या रिमेक बॉलीवूडमध्ये छप्पर फाड कमाई केली.

2003 मध्ये आलेला सतीश कौशिक दिग्दर्शित सलमान खानचा ‘तेरे नाम’ हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. सलमानने यात एका उत्कट प्रियकराची भूमिका साकारली होती. सलमानची यातील हेअर स्टाइल आजही सर्वांच्या लक्षात आहे. मूळ तमिळ चित्रपट ‘सेतू’चा (1999) हा चित्रपट हिंदी रिमेक होता.

पुरी जग्गनाध लिखीत आणि दिग्दर्शित तेलुगू चित्रपट ‘पोकिरी’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. एक गँगस्टर या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला होता, जो नंतर एक अंडरकव्हर कॉप म्हणून समोर येतो. प्रभुदेवाने तेलुगूमधील हा सुपरहिट चित्रपट हिंदीमध्ये ‘वॉन्टेड’ म्हणून दिग्दर्शित केला. सलमान या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत होता आणि चित्रपट देखील बॉलिवूडमध्ये तुफान गाजला.

तेलुगू चित्रपट ‘रेडी’चा सलमानचा ‘रेडी’चित्रपट हा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटातील गाण्यांसोबत हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला आणि या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला.

सलमान खानची मुख्य भूमिका असलेला आणि 2011मध्ये प्रदर्शित झालेला ‘बॉडीगार्ड’ हा याच नावाच्या मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 2010मध्ये हा मल्याळम चित्रपट रिलीज झाला होता. सलमान सोबत या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये करिना कपूर खान दिसली होती. सलमानचा हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता.

साजिद नाडियाडवालाने सलमान खानची प्रमुख भूमिका असलेला 2014मध्ये आलेला ‘किक’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. 2009मध्ये आलेल्या याच नावाच्या तेलुगू चित्रपटाचा हा चित्रपट हिंदी रिमेक आहे.

Leave a Comment