आता वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली लग्नाआधी गरोदर राहिलेली ही अभिनेत्री


अभिनेत्री अॅमी जॅक्सनने बॉलिवूडपासून दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील चित्रपटांमध्ये काम केले असून सध्या ती गरोदर आहे आणि ती हे दिवस एन्जॉय करताना दिसत आहे. अॅमी लग्नाआधीच गरोदर राहिल्यामुळे बी- टाऊनमध्ये तिच्या नावाची चर्चा झाली होती. सोशल मीडियावर अॅमी सक्रीय असून ती अनेकदा बेबी बंपसह स्वतःचे फोटो पोस्ट करत असते.


दरम्यान बॉयफ्रेंडसोबतचा अजून एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला असून तो भरपूर प्रमाणात व्हायरल होत आहे. अॅमी या फोटोमध्ये प्रियकरासोबत रोमँटिक डेटवर असल्याचे दिसते. सध्या प्रत्येक दिवस मनमुरादपणे जगणारी एमी यात प्रियकराला किस करताना दिसत आहे. तर ती दुसऱ्या फोटोमध्ये अल्ट्रासाउंड करताना दिसत आहे.

View this post on Instagram

Goodmorning Paradise ✨

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on


अॅमीने हे दोन्ही फोटो शेअर करताना लिहिले की, या आयुष्यात मी एका गोष्टीबद्दल निश्चित आहे की, तू सर्वोत्कृष्ट बाबा होशील. एमी नुकतीच रजनीकांत यांच्यासोबत २.० चित्रपटात दिसली होती. अक्षय कुमारने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती.

Leave a Comment