हार्दिक पांड्यामुळे फसला रणवीर सिंह


सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या व्यक्तिरेखेत अभिनेता रणवीर सिंह फारच मिसळून गेला आहे. तो त्याच्या आगामी ८३ चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तो नुकताच भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान क्रिकेटच्या मैदानावर भारतीय संघाला पाठिंबा द्यायला गेला होता. अनेक क्रिकेट खेळाडूंसोबत येथे त्याने व्हिडिओ आणि सेल्फी काढले. हे कमी की काय त्याने काही वेळासाठी समालोचनची जबाबदारीही स्वीकारली. हे सगळेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. रणवीरला व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे डब्ल्यूडब्ल्यूईच्या प्रसिद्ध रेसलरकडून चांगलेच ऐकूण घ्यावे लागले. त्याने फक्त रणवीरला झापलेच नाही तर त्याच्यावर चोरीचा आरोपही केला आहे.

एकीकडे सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरसोबतच फोटो रणवीरने शेअर केले तर त्याने हार्दिक पांड्यासोबतचा फोटो शेअर करत भन्नाट कॅप्शन दिली. त्याने पांड्याच्या फोटोला कॅप्शन देताना लिहिले की, Eat. Sleep. Dominate. Repeat. The name is Hardik. Hardik Pandya. @hardikpandya7 ma boi #unstoppable’. WWE चा प्रसिद्ध रेसलर पॉल हेमॅन रणवीरच्या या कॅप्शनवर नाराज झाला आणि रागात त्याने ट्विटरवरच रणवीरची शाळा घेतली.

हेमॅनला राग यासाठी आला की, हेमॅनच्या रिंगमधील एण्ट्रीला Eat. Sleep. Dominate. Repeat हे वाक्य वापरले जाते. हेमॅनच्या मते, त्याचे या वाक्यावर कॉपीराइट आहेत. हेमॅनने रणवीरचे ट्वीट शेअर करताना लिहिले की, @RanveerOfficial, ARE YOU KIDDING ME??????????? 1 – It’s Eat Sleep CONQUER Repeat 2 – Copyright #YourHumbleAdvocate and @BrockLesnar 3 – I am litigious 4 – EAT SLEEP DEPOSITION REPEAT.

याचा अर्थ की, रणवीरवर कॉपीराइटवरून चोरीचा आरोप हेमॅनने केला. पण हेमॅन हा काही रागात नाही तर मस्करीत बोलत होता. त्याने याआधीही आपल्या या वाक्याचा ट्विटरवर अनेकदा वापर केला आहे. या प्रकरणात अद्याप रणवीरने कोणतेही उत्तर दिलेले नाही.

Leave a Comment