गांधींच्या नव्या पीढीने योगा न केल्यामुळे त्यांचे राजकारण बिघडले


नवी दिल्ली : पुन्हा एकदा योगगुरु रामदेव बाबा यांनी जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने एक राजकीय वादग्रस्त वक्तव्य केले आहे. रामदेवबाबा यांनी गांधींच्या नव्या पीढीने योगा न केल्यामुळेच त्यांचे राजकारण बिघडल्याचे मत व्यक्त केले आहे.

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने रामदेवबाबा नांदेड येथे जाणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी हजर असणार आहे. रामदेव यांनी त्यापूर्वीच वादग्रस्त वक्तव्य करत वाद ओढावून घेतला आहे. रामदेव म्हणाले, सार्वजनिकपणे पंतप्रधान मोदी योगा करतात. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी लपून योगा केला. त्यांच्या पुढील पीढीने योगाच न केल्यामुळे त्यांच्या राजकारणात गडबड झाली आणि अपयश आले. योग करणाऱ्यांचे अच्छे दिन नक्कीच येतात. काँग्रेसवर टीकेची एकही संधी रामदेव यांनी सोडलेली नाही. त्यांच्याकडून अनेकदा वादग्रस्त वक्तव्यही केली गेली. पण आता काँग्रेसच्या अपयशामागे थेट योगाचा संबंध जोडून ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Leave a Comment