व्हॉट्सअॅपने सादर केले आणखी एक भन्नाट फीचर


आपल्या उपभोगत्यांना नेहमीच नवनवीन अनुभव देण्यासाठी व्हॉट्सअॅप सतत नवीन फीचर्स सादर करत असते. व्हॉट्सअॅपने यावेळेस लोकाग्रहास्तव एक नवीन फीचर सादर केले आहे. आता या फीचरमुळे आपणाकडून कोणालाही चुकीचा संदेश आणि फोटो पाठवला जाऊ शकणार नाही. या फीचरमुळे आता तुम्हाला कोणासमोरही शरमेने मान खाली घालावी लागणार नाही. यासंर्दभात mspoweruser.com च्या एका अहवालानुसार, आपले नवीन फीचर बीटा वर्जन 2.19.173 मध्ये कंपनीने रोलआउट केले आहे.

आपण बऱ्याचदा घाई घाईत एकाचा मेसेज दुसऱ्याला पाठवतो. एका व्यक्तिला फोटो पाठवायचा असेल तर कधी कधी तो दुसऱ्याला पोहचतो अशा वेळी आपणाला अक्षरशः शरमेने मान खाली घालायला लागते. व्हाट्सअॅपने हीच गोष्ट टाळण्यासाठी हे नवीन फीचर सादर केले आहे. यापुढे आता व्हाट्सअॅपवर कोणताही मेसेज अथवा फोटो पाठवण्याधी तुम्हाला टॉप लेफ्ट कॉर्नरमध्ये त्या व्यक्तीचा प्रोफाइल फोटो दिसेल, तसेच कॅप्शन एरियाचे खाली त्या व्यक्तीचे नाव लिहिलेले दिसेल. यामुळे चुकीच्या व्यक्तिला मेसेज अथवा फोटो जाण्याची शक्यता फार कमी होणार आहे.

हे फीचर सध्या बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. त्याचे लवकरच स्टेबल व्हर्जनदेखील सादर केले जाणार आहे. हे फिचर सध्या फक्त अँड्रॉइड फोनमध्येच उपलब्ध होणार आहे. दरम्यान, व्हाट्सअॅप याआधी देखील आपल्या अनेक फीचर्सवर काम करत असल्याची माहिती मिळाली होती. यात डार्क मोड, ऑथेंटिकेशन फीचर आणि पीआयपी मोड यांचा समावेश होता. व्हाट्सअॅप आता यातील काही फीचर्स आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये रोल-आउट करत आहे.

Leave a Comment