संजय दत्त या चित्रपटाद्वारे करणार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण


लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत एक दिग्गज कलाकार पदार्पण करणार आहे. पण या चित्रपटाची तो फक्त निर्मिती करणार आहे. हिंदी सिनेसृष्टीतील ते दिग्गज नाव आहे अभिनेता संजय दत्त. नुकतेच ट्विटरच्या माध्यमातून आपल्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याच्या मराठी चित्रपटाचे नाव ‘बाबा’ असे असून हा चित्रपट त्याने आपले वडील सुनील दत्त यांना समर्पित केला आहे. संजय एस. दत्त प्रोडक्शन्स आणि ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स निर्मित ‘बाबा’ हा चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


हा चित्रपट माझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या माझ्या बाबांना समर्पित, असे ट्विट संजय दत्तने केले आहे. राज आर. गुप्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटाचे मोशन पोस्टर देखील संजयने लाँच केले आहे. या पोस्टरमध्ये एक लहान मुलगा त्याच्या वडिलांसोबत सायकलवर बसलेला दिसून येत आहे. या चित्रपटाची भावनेला भाषा नसते अशी टॅगलाईन आहे. यात कोणकोणते कलाकार भूमिका साकारणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Leave a Comment