‘या’ बाहुबली फलंदाजांना मागे टाकत इयान मॉर्गनने रचला इतिहास


मँचेस्टर – काल विश्वचषक स्पर्धेत ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर यजमान इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघादरम्यान सामना खेळवला गेला. इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन याने या सामन्यात आक्रमक फलंदाजी करत ७१ चेंडूत १४८ धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत मार्गन याने तब्बल १७ षटकांराची ‘आतषबाजी’ करत एक विक्रम आपल्या नावे केला.

कर्णधार मॉर्गनने अफगणिस्तान विरुध्द आक्रमक फलंदाजी करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याआधी सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम तीन खेळाडूंच्या नावावर होता. वेस्ट इंडीजचा फलंदाज ख्रिस गेल, भारताचा रोहित शर्मा, दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डीव्हिलिअर्स आणि यांनी एका डावात 16 षटकार ठोकले होते. आता मॉर्गनने त्यांना मागे टाकले आहे. भारताचा रोहित शर्मा, वेस्ट इंडीजचा फलंदाज ख्रिस गेल, दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डीव्हिलिअर्स यांना मागे मॉर्गनने टाकले आहे. काल खेळवल्या गेलेल्या सामन्यात मॉर्गनने ५७ चेंडूंमध्ये शतक झळकावले. मॉर्गनच्या या खेळीमध्ये ४ चौकार आणि १७ षटकारांचा समावेश आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी याने आपल्याच गोलंदाजीवर मॉर्गनला बाद केले.

Leave a Comment