यापुढे अशिक्षित किंवा न शिकलेली व्यक्तीही ड्रायव्हींग लायसन्ससाठी पात्र


नवी दिल्ली – मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातही दळणवळणमंत्री म्हणून नितीन गडकरी शपथ घेतल्यानंतर, त्यांनी अशिक्षित युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पहिलाच महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

वाहनचालक म्हणून अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या युवकांना इच्छा असूनही रोजगार उपलब्ध होत नसल्याने सरकारने वाहनचालकाचा परवाना काढण्यासाठी 8 वी पास असणे बंधनकारक केले होते. पण आठवी पास असण्याचा नियम नितीन गडकरी यांनी शिथिल केल्यामुळे, यापुढे अशिक्षित किंवा न शिकलेली व्यक्तीही ड्रायव्हींग लायसन्स काढण्यास पात्र ठरणार आहे. सद्यस्थितीत देशातील ट्रान्सपोर्ट क्षेत्रात 22 लाखांपेक्षा अधिक ड्रायव्हरांची गरज असल्यामुळे, गडकरींच्या अधिपत्याखाली दळणवळण मंत्रालयाने दूरदृष्टी आणि रोजगार याचा विचार करुन हा निर्णय घेतला आहे. याबाबत, खुद्द नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.


हा निर्णय केंद्रीय मोटार वाहन नियमावली 1989 या कायद्यात सुधारणा करुन घेण्यात आला आहे. अशिक्षीत किंवा अडाणी व्यक्तीलाही गडकरींच्या या निर्णयामुळे आता ड्रायव्हिंग लायन्सस काढता येईल. त्यामुळे बेरोजगारांना चांगली संधी आहे. दरम्यान, ड्रायव्हिंगच्या ट्रेनिंगसाठी देशात 2 लाख स्कील सेंटरही उभारण्यात येणार आहेत.

Leave a Comment